म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीच्या वृत्तांमध्ये काहीच तथ्य नाही,' असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले. 'राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपच्या जवळ जाणार नाही. आमची आणि त्यांची विचारसरणी वेगवेगळी आहे. दोहोंमध्ये सख्य अशक्य आहे,' असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नजरचुकीच्या निर्णयावरही पाटील यांनी सडकून टीका केली. 'आमचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली. ही आघाडी भक्कम असून, नव्या राजकीय समीकरणात काडीचेही तथ्य नाही. भाजपला करोना साथरोगाचे काही पडलेले नाही. काही झाले तरी सत्तेत कसे यावे याकडे त्यांचे लक्ष आहे,' असे जयंत पाटील म्हणाले. फटक्याच्या भीतीने निर्णय रद्द केंद्राच्या व्याजदरकपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेण्यात आला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत राजकीय फटका बसेल, या भीतीने केंद्राने हा निर्णय मागे घेतला, असा आरोपही पाटील यांनी केला. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल शंका निर्माण करण्याचे काम होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीत एकत्र काम करत असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ज्यांना आमच्या खुर्चीवर बसायचे आहे, त्या शक्ती हा प्रयत्न करत आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wfUVbn
No comments:
Post a Comment