Breaking

Friday, April 2, 2021

अभिनेत्रीनं विमानातली सीट स्वतःच केली सॅनिटाइझ, म्हणते... https://ift.tt/3ugtn3E

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून देशात करोना व्हायरसचं संक्रमण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रतही मागच्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं लागेल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनाही करोनाची लागन झाली आहे. त्यामुळे करोनापासून चाहत्यांना जागरूक करण्यासाठी अभिनेत्री रवीना टंडननं एक जुना व्हिडीओ शेअर करत चाहच्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. रवीना टंडननं डिसेंबर २०२०चा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती विमानातून प्रवास करताना आपली सीट आणि आजूबाजूचा भाग सॅनिटाइझ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रवीनानं लिहिलं, 'हा कदाचित माझा वेडेपणा आहे पण हे चांगलं सुद्धा आहे. करोना काळात विमानातून प्रवास करत असतानाचा डिसेंबर २०२०चा हा जुना व्हिडीओ. कृपया मास्कचा वापर करा. भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वतःची आणि दुसऱ्यांचीही काळजी घेऊयात.' या आधी रवीनानं मार्च २०२० मध्येही अशाच प्रकारचा एका व्हिडीओ शेअर केला होता. ज्यातून तिनं करोनाबाबत जागरुकता पसरवण्याचा संदेश दिला होता. या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसली होती आणि त्यावेळी स्वतःची सीट आणि केबीन सॅनिटाइझ करतानाचा व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मागच्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट, आमिर खान, परेश रावल, रणबीर कपूर, संजय लीला भंसाली, सतीश कौशिक, कार्तिक आर्यन, तारा सुतारिया अशा अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. तर मागच्या वर्षीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली होती. ज्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, अर्जुन कपूर, मलाइका अरोड़ा या सेलिब्रेटींचा समावेश होता. दरम्यान करोनाच्या काळात बॉलिवूडला बरंच नुकसान सोसावं लागलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39E3Ppa

No comments:

Post a Comment