मुंबई: राज्यात करोना संसर्गाची स्थिती दिवसागणिक भयानक होत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना हॉस्पिटलमधील बेड कमी पडत आहेत. त्यातच रक्ताचाही तुटवडा आहे. केवळ सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी तरुणाईला रक्तदानाचं आवाहन केलं आहे. वाचा: आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील रक्तसाठ्याची सद्यस्थितीची माहिती दिली आहे. 'ब्लड बँका रिकाम्या झाल्या आहेत. आपल्याकडं पुढचे सात-आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळं लोकांनी पुढं येऊन करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं तरुणांनी स्वेच्छेनं व नि:स्वार्थ भावनेनं पुढं यावं,' असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे. 'रक्तदान करा, जीव वाचवा' असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असताना रक्ताची मागणीही वाढली आहे. मात्र, संसर्गाच्या भीतीनं सध्या रक्तदानाचं प्रमाण कमी झालं आहे. मागील वर्षी अशी परिस्थिती उद्भवल्यामुळं अनेक शस्त्रक्रिया पुढं ढकलाव्या लागल्या होत्या. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री कालच राज्यातील रक्तसाठ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. सध्या संपूर्ण लॉकडाऊन नसल्यामुळं लोकांनी आपापल्या परिसरात रक्तदान शिबिरं आयोजित करावीत, असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे. वाचा: वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39w1RHx
No comments:
Post a Comment