Breaking

Thursday, April 1, 2021

पेट्रोल आणि डिझेल दर ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर https://ift.tt/2R0N4hF

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. मात्र तरीही काही शहरांदमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. आज शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.५८ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता. गेल्या काही सत्रांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती. तेलाचा भाव ६० डॉलरपर्यंत खाली आला होता. तेलाचा पुरवठा मर्यादित असल्याने तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली होती. खनिज तेल उत्पादक देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या ओपेकने जून-जुलैमध्ये तेलाचे उत्पादन वाढण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, जागतिक बाजारात आज शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव २.१२ डॉलरने वधारला. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ६४.८६ डॉलर झाला आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव २.२९ डॉलरच्या तेजीसह ६१.४५ डॉलर झाला आहे. करोना संकटातून बहुतेक देश सावरले आहेत. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. सुएझ कालव्याची कोंडी फुटल्यानंतर जवळपास ४०० मालवाहू जहाजे मार्गस्थ झाली आहेत. त्यामुळे तूर्त विस्कळीत झालेला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Of1nxX

No comments:

Post a Comment