Breaking

Sunday, April 4, 2021

सुरक्षारक्षकाकडून भटक्या कुत्र्यांवर अत्याचार; विकृताला अटक https://ift.tt/3wuCsHQ

म. टा. प्रतिनिधी, पुणे मॉडेल कॉलनी परिसरात एक सुरक्षारक्षक भटक्या कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. बाबुराव भाऊराव मोरे (वय ६५, रा. जनवाडी) असे अटक केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पल्लवी भैरप्पा गौडा यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना ऑक्टोबर २०२० मध्ये एक सुरक्षारक्षक रस्त्यावरील कुत्र्यांना सोसायटीच्या आतमध्ये घेऊन जात अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी कोणीतरी पाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो निघून गेला होता. गौडा यांनी हा प्रकार प्राण्यांचे डॉक्टर शाभवी सबणीस यांना सांगितला. त्यांनी बचाव पथकाच्या सदस्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पथकाने काही दिवस पाळत ठेवली. पण, त्यांना असा प्रकार आढळला नाही. मात्र, शनिवारी मध्यरात्री गौडा यांना पुन्हा तो सुरक्षारक्षक कुत्र्याला उचलून घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच, बचाव पथकाच्या सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर डॉ. शाभवी सबणीस व इतर सदस्य घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांनादेखील हा प्रकार कळविला. तो सुरक्षारक्षक अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखविले. त्या कुत्र्याला बावधन येथील रेस्कू चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी मोरे याला अटक केली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी खूप चांगले सहकार्य केले. शहरात अशा घटना घडत असतात. बऱ्याच वेळा हे प्रकार उघड होत नाहीत. पण, या केसमध्ये योजना करून तीन दिवस निगराणी केली. पल्लवी गौडा यांच्या सहकार्यामुळे या प्रकाराकडे लक्ष गेले. पुरावेदेखील मिळाले आहेत. कोर्टात गेल्यानंतर आरोपीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील. - सुमेध तरडे, बचाव पथकाचे सदस्य


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ullxWv

No comments:

Post a Comment