नवी दिल्लीः पश्चिम बंगाल आणि आसामसह ४ राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यात आज मंगळवारी ६ एप्रिलला पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. यासह तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीतही मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शांततेत मतदान होण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या ८३२ कंपन्या तैनात आहेत. यापैकी शिघ्र कृती दलाच्या २१४ कंपन्या तिसऱ्या टप्प्यात तैनात असतील. LIVE अपडेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होत आहे. सर्वांना विशेषत: तरुण मतदारांना मोठ्या संख्येत मतदानाचं आवाहन करतो, असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलंय. केरळ : मेट्रो मॅन श्रीधरन यांनीही पोन्नानीमध्ये मतदान केलं तमिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मतदान केलं तामिळनाडू : अभिनेते रजनीकांत, कमल हासन यांनी बजावला मतदानाचा हक्क तमिळनाडू : अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी चेन्नईत मतदान केलं. यावेळी त्यांच्या मुली श्रुती हसन आणि अक्षरा हसन यांनीदेखील रांगा लावून मतदान केलं केरळ : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कुन्नूर इथे मतदान केलं - पश्चिम बंगालमध्ये आज ३१ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार - आसाममध्ये तिसऱ्या टप्प्यात ४० जागांसाठी मतदान होणार - केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी मतदान होणार आहे. १४० जागांसाठी ९५७ उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात - तामिळनाडूतील २३४ जागांसाठी मतदान होणार - केंद्र शासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत विधानसभेच्या ३० जागांवर मतदान
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/322zL2B
No comments:
Post a Comment