मुंबई ः बेकायदा ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अभिनेता याला मुंबई विमानतळावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला अटकही केली होती. दरम्यान, एजाज खानची मेडिकल टेस्ट केली असता त्याला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. आता एजाज खान याला तुरुंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात येत आहे. एजाज खानला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता त्याच्यासोबत असलेल्या NCB च्या अधिका-यांची ही टेस्ट करण्यात येणार असल्याचं समजतं. NCB अधिका-यांनी असा दावा केला होता की, मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर असलेल्या शादाब बटाटा याच्याशी एजाज खान याचे कनेक्शन आहे. शादाब यालाही NCB ने काही दिवसांपूर्वी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. शादाब बटाटा हा ड्रग्जचा मोठा सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. गौरव दीक्षितचे नाव घेतले दरम्यान NCB च्या अधिका-यांना एजाज खानने चौकशीमध्ये टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित याचे नाव सांगितले होतेत्यानंतर NCB च्या अधिका-यांनी अंधेरीमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील गौरवच्या घरी छापा घातला परंतु त्या आधीच गौरव त्याच्या डच गर्लफ्रेंडबरोबर फरार झाला होता. दरम्यान, गौरवच्या घरात ड्रग्ज पॅक करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, मशिनरी आणि मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा NCB अधिका-यांच्या हाती लागला होता. NCB चे अधिकारी फरार झालेला गौरव आणि त्याच्या मैत्रिणीचा शोध घेत आहेत. निर्दोष असल्याचा दावा एजाज खान याने याआधी याप्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याने सांगितले की, 'माझ्या घरी झोपेच्या फक्त चारच गोळ्या सापडल्या होत्या. माझ्या बायकोचा गर्भपात झाल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे या गोळ्या तिच्यासाठी आणल्या होत्या. ' एजाज खानला राजस्थानहून मुंबईत परतला तेव्हाच NCBच्या अधिका-यांनी विमानतळावरच त्याला ताब्यात घेतले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dD5Gf0
No comments:
Post a Comment