Breaking

Sunday, April 4, 2021

OTT वर महिलाराज; गाजताहेत चौकटीबाहेरच्या भूमिका https://ift.tt/3rJRQMZ

सुंदर दिसणारी, साचेबद्ध बांधा असणारी, संस्कारी, सोज्वळ आणि फक्त कुटुंबाचा विचार करणारी अशा महिला व्यक्तिरेखा आजवर सिनेमा, मालिकांमध्ये बघितल्या असतील. अशाच प्रकारची महिला पात्रं लिहिली गेली आहेत. हसरा चेहरा, त्यागमूर्ती, सहनशील अशा व्यक्तिरेखा रंगवल्या गेल्या. अशा पात्रांची प्रेक्षकांनासुद्धा भुरळ पडते. घरात येणारी सून अशीच असावी किंवा आपली सासू अशीच असावी अशी स्वप्नरंजन करायला भाग पाडणारी ही पात्रं असतात. पण ओटीटीवर (ओव्हर द टॉप) चित्र वेगळं आहे. या नव्या माध्यमावर महिला चाकोरीबाहेरच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. प्रत्येक वयोगट, वर्ग आणि स्तरातल्या महिलांचं प्रतिबिंब वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. ओटीटीवर महिलाराज'शी', 'बुलबुल', '', '', ', 'फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलिवूड वाइव्स', 'आर्या', 'द मॅरीड वूमन', 'फोर मोर शॉर्ट्स प्लीज', 'हंड्रेड' या सगळ्या सीरिजमध्ये महिला पात्रांच्या वेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. ही पात्र मोठ्या किंवा छोट्या पडद्यावरील व्यक्तिरेखांसारखी अजिबात नाहीत. ओटीटीवर कधी तुटपुंज्या पगारात घर चालवणारी तर कधी महिला पोलिस अधिकारी दाखवण्यात आली आहे. ही पात्र चित्रपट किंवा मालिकांच्या चौकटीबाहेरची आहेत. अशा प्रकारच्या पात्रांना ओटीटीवर न्याय मिळत आहे. महिलांच्या मनात उमटणाऱ्या प्रत्येक तरंगाची छटा या पात्रांच्या माध्यमातून दाखवली जाते. गोष्ट सांगण्यासाठी...आपल्याकडे 'चांगल्या घरातल्या मुली' असा लेबल लावला जातो. यामध्ये संस्कारी, सोज्वळ आणि सहनशील महिलांचा समावेश होतो. पण वेब सीरिजमधील महिला पात्रांचा अभ्यास केला तर कोणत्याच व्यक्तिरेखेला 'चांगल्या घरातल्या मुली' असं लेबल लावता येणार नाही. ओटीटीवर महिलांना त्यांच्या चारित्र्यानुसार टॅग न देता किंवा टिका टिपणी न करता दाखवलं जात आहे. त्यांची गोष्ट सांगणं हा एकमेव उद्देश असतो. एवढंच नाही तर कमतरतादेखील चांगल्या प्रकारे दाखवल्या जात आहेत. 'मेड इन हेवन'मध्ये तारा हे पात्र साकारणारी सोभिता धुलिपाला सांगते की, 'परफेक्ट मुलगी, सून किंवा बायको असण्याची अपेक्षा महिलांकडूनच का ठेवली जाते? आपल्याकडे परफेक्ट असण्याची व्याख्याच चुकीची आहे. प्रत्येक महिलेनं खरं असलं पाहिजे. तसंच स्वत:ला दाखवलं पाहिजे. जगात पूर्ण काळं किंवा पूर्ण पांढरं असं काहीही नाही. आमच्यातसुद्धा कमतरता असू शकतात. प्रत्येक महिला वेगळ्या स्वभावाची असू शकते. हेच ओटीटीवर दाखवलं जात आहे. हे चांगले बदल आहेत. आता तर कॅमेऱ्याच्या मागेसुद्धा महिलाच कार्यरत आहेत'. ओटीटीवरील या नव्या बदलाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून काही वेब सीरिजमधल्या अशा महिला व्यक्तिरेखांना तुफान प्रतिसाद मिळतोय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sJIT7P

No comments:

Post a Comment