तैपई: प्रियकराने प्रेयसीला धोका दिल्यामुळे ब्रेकअप होतात, काही वेळेस मारहाणीचे प्रसंग घडतात. मात्र, तैवानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढ झोपेत असलेल्या प्रियकराचे गुप्तांगच कापले. कापलेले गुप्तांग टॉयलेटमध्ये फ्लश केले. प्रियकराचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने हे कृत्य केले. या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, पीडित व्यक्तीचे नाव हुआंग (५२ वर्ष) आहे. तैवानमधील चान्घुआ काउंटीमधील शीहु टाउनशीपमध्ये तो राहत होता. घटना घडली तेव्हा तो त्याच्याच घरी होता. हुआंगला तीन मुलेदेखील आहेत. हुआंगच्या घरी आरोपी महिला आली. त्या दोघांमध्ये वादावादीदेखील झाली. त्यानंतर हुआंग मद्यपान करून जेवून गाढ झोपी गेला. वाचा: रात्री जाग आल्यानंतर त्याला गुप्तांग २० टक्के कापले असल्याचे लक्षात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. जखमेमुळे त्याला वेदनाही जाणवत होत्या. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या कात्रीने आरोपी महिलेने प्रियकराचे . वाचा: आरोपीने कापलेल्या गु्प्तांगाचा भाग टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केला. जेणेकरून शस्त्रक्रिया करून हा भाग पु्न्हा जोडता कामा नये. या घटनेनंतर आरोपी प्रेयसीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. वाचा: पोलिसांनी घराबाहेरून रक्ताने माखलेली कात्रीदेखील जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यानंतरही जखमी चालत होता. उपचारासाठी आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. आरोपीने प्रियकराचे लिंग १.५ सेमी भाग कापला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cOfjIF
No comments:
Post a Comment