Breaking

Sunday, April 4, 2021

छत्तीसगड नक्षलवादी हल्ला; २२ जवान धारातीर्थी, PM मोदींचा इशारा https://ift.tt/3cN9JX6

जगदलपूरः छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले. यातील काही जवानांचे मृतदेह हाती आले आहेत. या चकमकीत अनेक जवान बेपत्ता आहेत. बीजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरलं होतं. ४ तास ही चकमकत चालली. या चकमकीत ९ नक्षलवादीही ठार झाले. तर जवळपास ३२ जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, स्थानिक पत्रकारांच्या गटाने आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी २२ जवान शहीद झाल्याचं त्यांना दिसून. अजूनही बचाव पथक पोहोचलं नसल्याची माहिती. बेपत्ता जवानांचा शोध सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. नक्षलवादी हल्ल्यात ३२ जवान जखमी झाले आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली. यासोबच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी नक्षलवाद्यांना गंभीर इशाराही दिला जवानांवर तीन बाजूंनी केला गोळीबार जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर शुक्रवारी रात्री CRPFचे कोब्रा कमांडो, CRPF बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली होती. पण नक्षलवाद्यांनी ७०० जवानांना घेरत तीन बाजूंनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. यात २२ जवान शहीद झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. नक्षलवाद्यांनी जवानांची दोन डझनहून अधिक शस्त्र लुटली आहेत. घटनास्थळी १८० नक्षलवाद्यांशिवाय कोंटा एरिया कमेटी, पामेड एरिया कमेटी, जगरगुंडा एरिटा कमेटी आणि साबागुडा एरिया कमेटीचे जवळपास २५० नक्षलवादीही होते. नक्षलवादी दोन ट्रॅक्टरमध्ये मृतदेह घेऊन गेल्याची माहिती आहे, असं पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितलं. बीजापूर-सुकम जिल्ह्याच्या सीमाभागात असलेला जोनागुडा डोंगराळ भाग हे नक्षलवाद्यांचे मुख्य ठिकाण आहे. इथे नक्षलवाद्यांची संपूर्ण एक बटालियन आणि अनेक प्लाटून कायम तैनात असतात. या संपूर्ण भागाचं नेतृत्व नक्षलवादी सुजाता हिच्या हातात आहे. नक्षलवादी जवानांवर मोठा हल्ला करणार अशी शंका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आधीच होती. यामुळेच संपूर्ण भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाईसाठी २ हजारांहून अधिक जवानांना उतरवण्यात आलं होतं. पहिल्या गोळीबारात मोठं नुकसान झालं. पण जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर देत त्यांचा वेढा तोडला आणि तीनहून अधिक नक्षलवाद्यांना ठार केलं. जखमी जवानांना आणि शहीद जवानांचे मृतदेह ही बाहेर काढण्यात आले. शहीद जवानांमध्ये २-२ बस्तरिया बटालियन आणि डीआरजी आणि एक कोब्रामधील आहे, असं सांगण्यात आलं. CRPF चे DG छत्तीसगडमध्ये या मोठ्या घटनेनंतर सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह हे छत्तीसगडमध्ये दाखल झाले आहे. ते संपूर्ण स्थितीचा आढावा घेणार आहेत. बीजापूरमधील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना छत्तीसगडला जाण्याच्या सूचना दिल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी महासंचालकांना बीजापूरला जाण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात ते आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या घटनेचा निषेध केला आहे. जवानांचे शौर्य देश विसरणार नाही, असं राष्ट्रपती म्हणाले. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त नक्षलवाद्यांविरोधातील मोहीमेत जवान शहीद झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. जवानांची बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते विसरणारही नाही. माझ्या सहवेदना छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जावानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. शहीद जवानांचा पराक्रम विसरणार नाही. जखमी जवान लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अमित शहांचना नक्षलवाद्यांना गंभीर इशारा नक्षलवादी हल्ल्यात शूर जवानांनी बलिदानाची आहुती दिली. त्यांचं बलिदान हा देश विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आपल्या सहवेदना आहेत. आम्ही शत्रूला विरोधात कारवाई सुरूच ठेवू, असा गंभीर इशारा अमित शहांनी नक्षलवाद्यांना दिला आहे. तसंच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणाले... नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ७ जवानां प्रकृती आता चांगली आहे. पण अद्याप २१ जवान बेपत्ता आहेत आणि त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला आहे. सीआरपीएफचे डीजीही छत्तीसगडमध्ये आहेत. मी आज संध्याकाळी छत्तीसगडला रवाना होतोय, अशी माहीती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली. ते सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. २३ मार्चला नक्षलवाद्यांच्या स्फोटात ५ जवान शहीद छत्तीसगडमध्ये १० दिवसातील हा दुसरा आहे. यापूर्वी २३ मार्चला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून जवानांची बस उडली होती. त्यात ५ जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी IED चा स्फोट केला होता. नक्षलवाद्यांनी सरकारसमोर १७ मार्चला शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. जनतेच्या भल्यासाठी छत्तीसगड सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहोत, असं म्हणत नक्षलवाद्यांनी चर्चेसाठी तीन अटी ठेवल्या होत्या. सशस्त्र दलांना हटवणं, नक्षलवादी संघटनांवरील बंदी हटवणं आणि तुरुंगात कैद नेत्यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cLQrRO

No comments:

Post a Comment