Breaking

Sunday, April 4, 2021

एसटीचा नियोजन शुन्य कारभार; ९५ टक्के बस फेऱ्या रद्द https://ift.tt/3rOWcmj

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील एस. टी महामंडळ नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. आता मात्र, बुलडाणा आगाराचा नियोजन शुन्य कारभारामुळे चर्चेत आली आहे. या एसटी बसेसला लागणार मुख्य घटक असलेल्या डिझेलच उपलब्ध नसल्यामुळे जवळपास ९५ टक्के बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे या गैरसोयीचा त्रास मात्र प्रवाश्यांना भोगावा लागत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ५० टक्के प्रवासी वाहतुकीसाठी बसेसला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, वेळेवर रद्द झालेल्या बसेसमुळे उर्वरित बसमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे या होणाऱ्या गर्दीला जबाबदार कोण हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यावेळी नेहमीप्रमाणे सर्व कर्मचारी आपल्या सेवेवर आले असता त्यांना वेळेवर बसफेऱ्या रद्द झाल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्यांचे या भोंगळ कारभारामुळे बिन पगारी रजा होणार असून त्यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे. गेल्या शुक्रवार पासून डिझेल संपले आहे. त्यामुळे बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.आज बुलडाणा डेपोमध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के ऑपरेशन बंद आहे. कर्मचारीही सकाळपासून ड्युटीवर हजर आहेत. काही मोजक्याच बसेस सकाळपासूनच सोडण्यात आल्या आहे. मात्र जे कर्मचारी ड्यूटीवर हजर झाले असून त्याच्या हजेरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी प्रतिक्रिया बुलडाणा डेपोत वाहक असेलेले विजय पवार यांनी दिली आहे. याप्रकरणी मात्र बुलडाणा विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sOhX6N

No comments:

Post a Comment