अमरावती: जिल्ह्यात तालुक्यातील गावात रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीने सर्वांचीच झोप उडवली. जवळपास सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ( ) वाचा: बेलोरा गाव गाढ झोपेत असतानाच आगीचा भडका उडाला. रात्री दीड वाजता गावाच्या मध्यवर्ती भागात अचानक आग लागली. यावेळी सोसाट्याचा वाराही सुटलेला असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गावातील ग्रामस्थांनी प्रथम आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पहिली अग्निशमन गाडी रात्री दोन वाजता दाखल झाली. मात्र आग अधिकच पसरू लागल्याने दुसरी गाडीही बोलावण्यात आली. २.३० च्या सुमारास ही गाडी दाखल झाली आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले गेले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांसाठी ठेवलेला चारा व एक पेरणी यंत्र जळून खाक झाले आहे. वाचा: ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुणीतरी खोडसाळपणा करत ही आग लावली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे व त्याचवेळी तीव्र संतापही व्यक्त करण्यात येत आहे. गावचे पोलीस पाटील रविंद्र पाटील, राजू उघडे, नामदेव उघडे यांच्यासह गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळू शकला. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/336kQEP
No comments:
Post a Comment