Breaking

Saturday, May 1, 2021

सावधान! करोनाचे आणखी आठ नवे प्रकार; लसीकरण युद्धपातळीवर न झाल्यास... https://ift.tt/3vB79dj

मुंबई: करोनाचे आणखी आठ वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. यामुळे पुढची लाट नेमकी कशी असेल याचा अंदाज आतापासून बांधता येत नाही. मात्र हे सर्व रोखण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण होणे आवश्यक असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले. ( Maharashtra ) वाचा: लशीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जेणेकरून आपण करोनाविरोधी लढ्यासाठी आणखी सक्षम होऊ शकतो, असे मत यांनी व्यक्त केले. तर, आत्तापर्यंतच्या पाहणीत लशीचा प्रभाव आठ महिन्यांपर्यंत राहत असल्याचे समोर आले आहे. पुढे तो प्रभाव किती काळ टिकेल यावर अद्याप संशोधन सुरू असल्याचे प्रा. दीपा आगाशे यांनी सांगितले. सध्या कोणत्या कंपनीची लस घ्यावी यावरून विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले असता, देशात सध्या ज्या दोन लशी आहेत त्या दोन्ही प्रभावी असल्याची पुरेशी माहिती उपलब्ध आहे. यामुळे ज्या लशी आता उपलब्ध आहेत त्या लवकरात लवकर घेणे आवश्यक असल्याचे प्रा. आगाशे यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या लशींची सुरुवातीला मोजक्या भारतीयांवर चाचणी होईल त्यानंतरच ती सर्वांसाठी खुली केली जाईल. अर्थात या लशी आंतरराष्ट्रीय मानकांत उत्तीर्ण होऊन आलेल्या असल्यामुळे देशातील चाचणी लवकर पूर्ण होईल, असेही सांगण्यात येत आहे. वाचा: दोन मास्क आवश्यकच हवेतून पसरतो ही बाब काही महिन्यांपूर्वी शास्त्रज्ञांच्या लक्षात आली होती. मात्र त्यावर अधिक संशोधन आवश्यक होते. ते पूर्ण झाल्यावर असे लक्षात आले की करोनाबाधित व्यक्ती जेव्हा संवाद साधते तेव्हा तिच्या तोंडातून बाहेर येणारे जाडे तुषार जमिनीवर पडतात पण काही बारिक तुषार हे हवेत तरंगत राहतात आणि ते दुसऱ्याच्या शरीरात शिरकाव करतात. हा प्रकार विशेषत: बंद खोलीत होतो. यामुळे घरात हवा खेळती राहणे महत्त्वाचे आहे. तसेच आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो किंवा बाहेर वावरतो तेव्हा दोन मास्क आवश्यक आहेत. एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क असावा. एन ९५ असेल तर एकच मास्क पुरेसा असल्याचेही यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितले. वाचा: ठळक मुद्दे - गरोदर महिला आण लहान मुलांवर लशीची चाचणी झालेली नाही. यामुळे त्यांचे लसीकरण होत नाही. मात्र त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्यांनी वेळेवर लसीकरण पूर्ण करणे आवश्यक. - लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. याबाबतचे व्हायरल मेसेजेस चूक आहेत. - साधारणत: दोन आठवड्यात करोनाची लक्षणे समोर येतात. यामुळे चाचणी करून घेणे आवश्यक आहे. - वातावरणामुळे सर्दी खोकला झाला असला तरी वेगळे राहणे व लवकर बरे न झाल्यास चाचणी करणे आवश्यक. - प्रतिकार शक्ती ही आजार झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या प्रक्रियेतून किंवा लस घेतल्यानंतरच वाढू शकते. इतर कोणतेही काढे अथवा वाफारे घेऊन ती वाढत नाही. या बाबी तात्पुरत्या आहेत. याबाबतचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. पंतप्रधानांना पत्र दुसऱ्या लाटेचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे याबाबत ठोस काही सांगणे शक्य नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उपलब्ध झालेल्या माहितीवरून दुसरी लाट तरुणांना अधिक घातक असल्याचे दिसते. मात्र आताच तसे म्हणता येणे शक्य नाही. यासाठीच देशातील ४०० शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असल्याचेही सांगण्यात आले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3taqb8I

No comments:

Post a Comment