Breaking

Sunday, June 27, 2021

१५ दिवसांत दिल्ली 'एम्स' रुग्णालयात दुसऱ्यांदा आग, जीवितहानी नाही https://ift.tt/3A590Kw

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. आपत्कालीन विभागाजवळ तळमजल्यावर स्टोअर रुममध्ये ही आग लागली होती. गेल्या १५ दिवसांत एम्स रुग्णालयात दुसऱ्यांदा आगीची घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवलं. पहाटे ५.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णालयात आग लागल्यानंतर सर्वात अगोदर रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. रुग्ण बाहेर उभे असताना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं. या आगीत रुग्णालयाला फार नुकसान सहन करावं लागलं नाही. १६ जून रोजीही आगीची घटना यापूर्वीही १६ जून रोजी काही दिवसांपूर्वी एम्स रुग्णालयात आग लागल्याचा प्रकार घडला होता. रात्रीच्या वेळेस रुग्णालय इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागल्यानं रुग्णालय व्यवस्थापनाची धावपळ उडाली होती. तब्बल २२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली होती. परंतु, या घटनेतही कोणतीही जीवितहानी टळली होती. कारण हा मजला अगोदरच रिकामा करण्यात आला होता. सुरुवातीच्या चौकशीत रेफ्रिजरेटरमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यानं आग लागल्याचं समोर आलं होतं. ही आग रुग्णालयाच्या ''मध्ये लागली होती. इथे वेगवेगळ्या प्रयोगशाळा आणि चाचणी विभाग आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2T5jMQs

No comments:

Post a Comment