जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष यांना न्यायालयाचा अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने १५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही झुमा उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणांच्या चौकशीला उपस्थित राहण्याच्या आदेशांचे उल्लंघन केल्याने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली, त्या वेळी झुमा न्यायालयात उपस्थित नव्हते. पोलिसांसमोर हजर होण्यास त्यांना पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. स्वत:हून ते हजर झाले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल. घटनापीठाच्या न्या. सिसि खाम्पेपे यांनी हा आदेश दिला. झुमा यांना शिक्षा सुनावल्याच्या निर्णयाचे विविध सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा (वय ७९) यांनी २००९ ते २०१८ या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. उद्योगपती यांच्याशी संधान साधून भ्रष्टाचार केल्याचा ठपका झुमा यांच्यावर आहे. आरोपी गुप्ता बंधू सध्या युएईमध्ये आहेत. झुमा यांना आत्मसमर्पणासाठी पाच दिवसांचा वेळ दिला आहे. पाच दिवसांत स्वत: हून हजर न झाल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. वाचा: तीन वर्षांपूर्वी झुमा यांचा कार्यकाळ संपण्याच्या काही महिने आधीच त्यांना आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने त्यांना राष्ट्रपतीपदावरून हटवले होते. त्यांच्याविरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत. वाचा: ५० अब्ज रँडचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणात तीन गुप्ता बंधू मुख्य आरोपी आहेत. गु्प्ता बंधूंची झुमा यांच्याशी जवळीक होती. त्याच्याच फायदा हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. गुप्ता बंधूंना झुमा यांच्या दोन मुलांना कथित फायदाही करून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून गुप्ता बंधूंच्या प्रत्यार्पणाबाबत कारवाई सुरू झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3y1vs5k
No comments:
Post a Comment