अकोला: जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील लसीकरण केंद्रावर राडा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एक जण फरार झाला आहे. या गोंधळामुळं तेथील लसीकरण ठप्प झालं आहे. () मूर्तिजापूरच्या नगरपालिका परिसरातील लसीकरण केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली होती. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी नोंदणी केली जात होती. या नोंदणीसाठी आलेले प्रेम दुबे व सागर दुबे यांनी नोंदणी करणारे आरोग्य कर्मचारी हेमंत तायडे यांच्याशी वाद घातला. नोंदणी करतांना संबंधितास रांगेतील मागच्या व पुढच्या व्यक्तीविषयी का विचारता? असा सवाल त्या दोघांनी केला व तायडे यांना अर्वाच्च शब्दांत शिविगाळ केली. उपस्थित नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांनी शिवीगाळ सुरूच ठेवली. काही वेळाने लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या दिनेश दुबे यानं थेट आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना कळताच त्यांनी पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. लगेचच शहर पोलिसांनी प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंविच्या ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रेम व सागर दुबे यांना अटक करण्यात आली. दिनेश दुबे फारार झाला आहे. ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष शिंदे पुढील तपास करीत आहेत. आणखी वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uKaExf
No comments:
Post a Comment