Breaking

Saturday, January 13, 2024

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून; कोणत्या प्रमुख नेत्यांचा सहभाग? कसे असेल नियोजन? https://ift.tt/jta5Fgr

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आजपासून (रविवार) सुरू होणाऱ्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘इंडी’ आघाडीतील (इंडिया) घटक पक्षांना केले आहे. शनिवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असेही खर्गे यांनी सांगितले.‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये खर्गे यांनी आघाडीतील घटक पक्षांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘इंडियाच्या समन्वय समितीची ऑनलाइन बैठक शनिवारी पार पडली. त्यामध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली. जागावाटपाबाबत सर्व पक्षांचे समाधान झाले. येत्या काही दिवसांत आघाडी म्हणून संयुक्त कार्यक्रम आखण्यावरही आमची चर्चा झाली. त्या वेळी मी सर्व पक्षांना राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. या यात्रेमध्ये सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली जाईल,’ असे खर्गे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले. ‘जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यावर बैठकीत मतैक्य झाले. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आघाडीचे नेतृत्व खर्गे यांच्याकडे सोपविण्याचा प्रस्ताव काहींनी मांडला. तो सर्वांनी मान्य केला. येत्या काही दिवसांत नियोजनासाठी समिती नेमण्याचेही ठरविण्यात आले,’ असे पवार यांनी सांगिले.या बैठकीला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, द्रमुक नेत्या कनिमोळी उपस्थित होते. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला दांडी मारली.‘भारत जोडो’मध्ये रेड्डीही जाणारहैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘’ आजपासून (रविवारी) मणिपूर येथून सुरू होत असून, यात्रेत तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी सहभागी होणार आहेत. शनिवारी रेड्डी दिल्ली दौऱ्यावर होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. रविवारी सकाळी ते मणिपूरला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पुन्हा दिल्लीला येऊन दाओस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला हजेरी लावणार आहेत. नितीश यांनी नाकारले निमंत्रकपद‘इंडी’ आघाडीचे निमंत्रकपद स्वीकारावे, अशी विनंती या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांना करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळली. मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करण्यावरून नितीश नाराज असल्याची चर्चा आहे.नितीशकुमार यांनी आघाडीचे निमंत्रक म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. मात्र, ज्यांना आधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यांच्याकडेच ही जबाबदारी राहू द्यावी, असे नितीश यांचे मत पडले.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hzB8TY2

No comments:

Post a Comment