Breaking

Tuesday, June 1, 2021

प्रेयसीने दिली बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; प्रियकरानं केली हत्या https://ift.tt/3fEBcvB

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : वांद्रे परिसरात एका २१ वर्षीय तरूणीची हत्या केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला काही तासांतच गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बिपीन विनोद कंडुलना असे प्रियकराचे नाव असून, त्याला एका तरूणीने फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शारीरिक संबंध ठेवून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. परंतु हनी ट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या प्रेयसीची बिपीनने हत्या केली. बिपीन कंडुलना याची वर्षभरापूर्वी वांद्रे परिसरात राहणाऱ्या इशिता या तरूणीशी फेसबुकवर ओळख झाली. संपर्क क्रमांक मिळाल्यानंतर बिपीन आणि इशिता एकमेकांशी तासनतास बोलू लागले. भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एका हॉटेलमध्ये काम करणारा बिपीन तिला वारंवार भेटू लागला. रविवारी रात्री इशिता ही बिपीनच्या वांद्रे येथील लाल मिठी परिसरातील घरी आली होती. दोघांमध्ये शारीरिक संबध झाल्यानंतर ती बिपीनकडे दीड लाख रुपयांची मागणी करू लागली. पैसे न दिल्यास आरोपीला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्यानंतर बिपीनने तिची समजूत काढून वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी नेले. वांद्रे पश्चिम येथील सेंट फ्रेंसिस्कोच्या गल्लीजवळ इशिता पुन्हा पैसे मागू लागली. वारंवार समजावण्याचा प्रयत्न करूनदेखील इशिताने स्वत:चे कपडे फाडून घेत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बिपीनने संतापाच्या भरात तिचा गळा आवळून हत्या केली. मृतदेह मिळाल्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुधीर जाधव, किरण आहेर यांच्यासह शेख, हाके, राऊत, शेळके आणि पवार यांच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. मृतदेहाचा फोटो घेऊन पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. त्यावेळी इशिताची ओळख पटली. इशिता ही मूळची झारखंडची असून बिपीन तिच्यासोबत काही दिवसांपासून राहत होता अशी माहिती मिळाली. बिपीन हा देखील झारखंडचा असल्याने तो मुंबईतून पळण्याचा प्रयत्न करणार याचा अंदाज होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला हॉटेल आशीर्वाद येथून पकडले. इशिता खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत असल्याने तिला ठार केल्याचे बिपीन याने सांगितले


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vV5y2o

No comments:

Post a Comment