म. टा. प्रतिनिधी, मुंबईः माजी गृहमंत्री यांच्याप्रमाणे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. यांचीदेखील चौकशी करा, अशी मागणीवजा तक्रार सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) करण्यात आली आहे. देशमुख यांच्यासंबंधी तक्रार करणारे व त्याबद्दल 'ईडी'कडे जबाब नोंदविणारे अॅड. तरुण परमार यांनी ही तक्रार केली आहे. राऊत व त्यांचे स्वीय सहाय्यकांकडून मोठ्या प्रमाणात रकमेची देवाण-घेवाण सुरू असून त्यांची मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी केली जावी, असे अॅड. परमार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नागपूर जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन, नागपुरातील पोलिस विभागातील बदल्या, बिगर कृषी जमिनींमधील भ्रष्टाचार, सरकारी जमिनी स्वत:च्या ताब्यात घेणे, मुंबई व नागपूरदरम्यान हवालाच्या रकमेचे व्यवहार आदी माध्यमांतून शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार सुरू आहेत, असा आरोप परमार यांनी या तक्रारीत केला आहे. हे बेकायदा व्यवहार अनिल देशमुख व डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत सुरू आहेत. शिवाय नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, डॉ. राऊत यांचे स्वीय सहाय्यक ललित खोब्रागडे व डॉ. नंदा गवळी हेदेखील या गैरव्यवहारांमध्ये सामील आहेत. राऊत यांचा मुलगा कुणाल हा के. के. पॉवर, ए. के. लॉजिस्टिक्स व बग्गील या कंपन्यांमार्फत वीज विभागासंबंधी कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार कंत्राटामार्फत करीत आहेत. या कंत्राटातील हा गैरव्यवहार ५०० ते ६०० कोटी रुपयांचा आहे, असा आरोपही परमार यांनी केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SCeaN6
No comments:
Post a Comment