म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईचे आर. डी. त्यागी यांचा मुलगा राज त्यागी याला बुधवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. पत्नीचा पाठलाग आणि धमकावल्याची तक्रार करण्यात आल्याने वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात राज त्यागी याला अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात राज याला सशर्त जमीन मंजूर केला होता. त्यानुसार राज याने वांद्रे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयास कळवले होते. तरीही जामीन मिळताच राजने घराबाहेर पाळत ठेवली, वाहनाचा पाठलाग केला आणि धमकीही दिली, अशी तक्रार पत्नीने वांद्रे पोलिस ठाण्यात केली. पत्नीने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे वांद्रे पोलिसांनी राज याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी राज याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hndcg5
No comments:
Post a Comment