Breaking

Thursday, July 1, 2021

लोकलप्रवासासाठी कर्नाटक पॅटर्न राबवण्याची मागणी; काय आहे हा पॅटर्न? https://ift.tt/2Tl2YFe

म. टा. प्रतिनिधी, मुंबई आंतरराज्य रेल्वे आणि रस्ते प्रवासासाठी खर्चिक आरटीपीसीआर चाचणी अहवालाला पर्याय म्हणून लशीची एक मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करा आणि प्रवास करा, अशी मुभा देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. तर प्रवासासाठी लस घेतलेल्यांना प्रवासमुभा मिळावी, अशी मागणीही होत आहे. करोना लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक अडचण वाढते आहे. अशातच परवडणारी आणि सुविधाजनक लोकल प्रवास सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने कामाचे ठिकाण गाठण्याचा खर्चभार कसा पेलायचा हा प्रश्न मोठा होत आहे. करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लसीकरण सुरू झाले. मुंबईत अनेक नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्याही लाखोंवर आहे. यामुळे लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना लोकलमुभा द्यावी, अशी मागणी पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्ष प्रवक्ता मनोज टेकाडे आणि संपर्क प्रमुख अजय तापकिर यांनी केली आहे. मानसशास्त्रज्ञांना आव्हान सतत वाढणाऱ्या निर्बंधामुळे स्वभाव बदलले आहेत, सवयी बदलल्या आहेत. कुणाची स्थिरता गेली तर कुणाची विचारशक्ती. काहींनी एकाग्रतेची सवय घालवली तर काहींनी एकमेकांशी संवाद साधण्याचे कौशल्य गमावले. अधिक कडक निर्बंध अर्थात अघोषित लॉकडाउनमध्ये याचा सामना कसा करायचा हे मानसशास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yjLTu7

No comments:

Post a Comment