Breaking

Thursday, July 1, 2021

तिसऱ्या लाटेपासून लहान मुले सुरक्षित?; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात https://ift.tt/3w6W1EN

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची तिसरी लाट आल्यास त्यात मुलांना सर्वाधिक संसर्ग होईल का, या संदर्भात बालरोगतज्ज्ञांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. मुलांना करोना संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणात होणार नाही, असाही एक मतप्रवाह वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. लहान मुलांमध्ये मेलाटॉनिन नावाचे संप्रेरक मोठ्या प्रमाणात असते. मुलांचे वय वाढत जाते तसे याचे प्रमाण हळुहळू कमी होते. या संप्रेरकामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. साहजिकच लहान मुले करोना विषाणूला निष्प्रभ करू शकतील, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मुलांमध्ये आयएल-१७ ए आणि आयएफ-गॅमा या संप्रेरकांचे प्रमाण चांगले असते. त्यांच्या नाकात आणि घशात वेगळ्या प्रकारचे विषाणू आणि जंतू नियमित आढळतात. प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये करोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते. याचे कारण त्यांच्या नाकामध्ये एसीइ-२ या प्रकारची संवेदके खूप कमी प्रमाणात असतात. करोना विषाणूला नाकावाटे शिरण्यासाठी या संवेदकांचीची फार गरज असते. त्यामुळे बाधित रुग्णाजवळ संपर्क आला तरी विषाणू अत्यल्प प्रमाणात लहान मुलांच्या शरीरात शिरकाव करतात असे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. माधव साठे यांनी सांगितले. मुलांना आजार होत नाही. परंतु त्याऐवजी त्यांची प्रतिकारकशक्ती कार्यरत होते आणि त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार होऊन रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. जगभरात लहान मुलांमध्ये करोना आजार होण्याचे प्रमाण साधारण २ ते ५ टक्के आहे. त्यामुळे अनेक मुलांमध्ये करोनाची सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळतात. भारतात लहान मुलांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त नागरिकांना करोनाची लागणी झाली आहे. मात्र यात मुलांचे प्रमाण खूपच कमी आहे. मुंबईतील ५१ टक्के मुलांध्ये अँटिबॉडी तयार झाल्याचे दिसून आले आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. मात्र लहान मुले या आजाराला जास्त चांगला प्रतिकार करू शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. लसीकरण गरजेचे येत्या महिन्यात किंवा लवकरात लवकर मुलांना देता येईल अशी लस उपलब्ध झाली तर तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना वर्तविण्यात आलेला धोका नक्कीच कमी होईल असा विश्वास बालरोगतज्ज्ञ डॉ. विशू मोहिते यांनी व्यक्त केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wcAmuX

No comments:

Post a Comment