नवी दिल्लीः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामााजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( ) हे आपल्या खास कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या कवितांमधून ते विरोधकांवर कायम निशाणा साधत असतात. राज्यसभेत ( ) गुरुवारी करोना संसर्गावरील चर्चेवेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( ) यांनी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'खेला होबे'चा नारा दिला. त्यावरून आठवलेंनी त्यांच्यावर ( ) पलटवार केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावरून रामदास आठवलेंनी त्यांना टोला लगावला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'खेला' होणार नाही. कारण या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा 'मेला' होईल, असं आठवले म्हणाले. ममता बॅनर्जी या सध्या दिल्लीत आहेत. त्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात त्या विरोधी पक्षांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींना कोणीही रोखू शकत नाही आगमी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'खेला' नाही, तर सत्तेसाठी मोदींचा मेला होईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात २०२४ मध्ये पुन्हा NDA ची सत्ता येईल. ममतांच्या नेतृत्वात कितीही राजकीय पक्ष एकजूट झाले तरी मोदींना आता कुणीही रोखू शकत नाही, असं रामदास आठवले म्हणाले. करोनाच्या महामारीने संपूर्ण जग हादरलं आहे. भारतातील प्रत्येक नागरिक आणि महिला या करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मी स्वतः ११ दिवस मुंबईत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो होतो. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशाने करोना योद्ध्यांसाठी थाळी वाजवली होती. तरीही विरोधक सरकारवर का टीका करत ( सारे देश बजायी थी थाली, फिर सरकार को क्यों दे रहे हो गाली ) आहेत. करोनाची ती काळरात्र होती. करोनाला घाबरू नका आणि हारू नका. करोनाला आपण सर्व मिळून संपवूया आणि उद्ध्वस्त करूया. पंतप्रधान मोदींनी करोना काळात चांगलं काम केलं. यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकही समाधानी आहेत. नरेंद्र मोदी सच्चा माणूस आहे. पण राजकारणात कच्चा नाहीए, असं आठवले म्हणाले. जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत विरोधकांचं सत्तेचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. यामुळे विरोधकांनी राजकारण न करता करोनाच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन आठवलेंनी केलं. गो करोना गो असं आपण म्हटलं होतं. पण यानंतर करोना आपल्यास पाठिमागे लागला, असं म्हणताच राज्यसभेत हास्याचे फवारे उडाले. करोनाविरोधी लढाईत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वॉर्ड बॉय, सफाई कामगार आणि पोलिसांसह अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं आणि करत आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rJfPNS
No comments:
Post a Comment