Breaking

Thursday, July 29, 2021

घरात घुसून ४ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; नराधमाला न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा https://ift.tt/3rFiGYi

: धरणगाव तालुक्यातील पाळधी इथं एका बांधकाम मजुराने चार मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यात खटला चालून न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एका महिला संशयिताची निर्दोष मुक्तता केली आहे. रशिद उर्प पापा सलाम शेख (वय ४५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील रशिदची आत्या शबनुरबी हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील एका शेतकरी दाम्पत्याने घराचे बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी वरच्या मजल्यावर वीटा चढवण्यासाठी रशिद याला काम देण्यात आले. रशिदने २९ मार्च २०१४ रोजी शेतकरी दाम्पत्याच्या मुलीस पिण्यासाठी पाणी मागत घरात प्रवेश केला. शेतकऱ्याच्या मुलीसह तिच्या मैत्रिणी अशा १० ते १२ वयोगटातील तीन मुली यावेळी घरात होत्या. यांनतर घराचा दरवाजा बंद करुन रशिदने या तीनही मुलींवर अत्याचार केला. याचवेळी आणखी एक मुलीने दार ठोठावले. रशिदने तिला घरात घेऊन तिच्यावरही अत्याचार केला. दरम्यान, एका मुलीच्या आजीने बाहेरुन दरवाजा ठोठावला. रशिदने दरवाजा उघडला. यानंतर चारही मुली घराबाहेर पळून गेल्या. रशिदही बाहेर निघाला. यावेळी रशिदची आत्या शबनुरबी मुलींकडे पाहून हसत होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी दोन पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानतंर ही घटना उघडकीस आली. पालकांनी रशिद याला जाब विचारला असता त्याच्यासह शबनुरबी यांनी शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाळधी दुरक्षेत्र येथे दोघांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारपक्षाने एकूण ९ साक्षीदार तपासले. यात चारही पीडित मुलींचा समावेश होता. पीडित मुलींनी घडलेला प्रकार न्यायालयात कथन केला. सुनावणीअंती न्यायालयाने रशिद याला दोषी धरुन आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलींना देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत. तर शबनुरबी हिला निर्दोष मुक्त केले. सरकारपक्षातर्फे अॅड. सुरेंद काबरा यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3C4FUvZ

No comments:

Post a Comment