Breaking

Saturday, July 31, 2021

भारतात परतल्यावर मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी, अन्यायाला फोडली वाचा... https://ift.tt/3ilpA25

नवी दिल्ली : भारताची महिला बॉक्सर मेरी कोमचे आज भारतामध्ये आगमन झाले आणि आपल्या देशात आल्या आल्या लगेच तिने पदक न जिंकल्याबद्दल देशवासियांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर आप्लयाबरोबर झालेल्या अन्यायाला मेरीने वाचाही फोडली आहे. मेरी कोम म्हणाली की, " जेव्हा मी सामना खेळत होते तेव्हा मी आनंदी होते. कारण तीनपैकी दोन फेऱ्या मी जिंकल्या आहेत, हे मला माहिती होते. त्यामुळे हा सामना मी जिंकणार, याची मला खात्री होती. पण जेव्हा सामन्याचा निकाल सांगण्यात आला तेव्हा मला धक्काच बसला. कारण पंचांनी मला पराभूत असल्याचे सांगितले. मला वाटतं हा माझ्यावर झालेल्या अन्याय आहे. कारण दोन फेऱ्या सहज जिंकल्यावर मी कशी काय पराभूत होऊ शकते, हे अजूनही मला समजले नाही." भारतामध्ये परतल्या वर मेरी म्हणाली की, " पदक न जिंकता मी भारतामध्ये आली आहे, याचे मला सर्वात वाईट वाटते आहे. या लढतीमधील दोन फेऱ्या मी सहजपणे जिंकले होते, त्यानंतर माझा पराभव कसा काय होऊ शकतो? पण सरतेशेवटी मी कोणतेही पदल न जिंकता देशात परत आले आहे आणि त्यासाठी मी भारतवासियांची माफी मागते." मेरी कोमची जर कोणी लढत पाहिली असेल तर, सामना संपल्यावर मेरी ही आनंदात होती. त्यावेळी मेरीला नेमकं काय करावे हे सुचत नव्हतं. कारण जेव्हा तुम्ही तीनपैकी दोन फेऱ्या जिंकता तेव्हा तुम्हीच विजयी ठरणार, असे तुम्हाला वाटू शकते. पण मेरीच्या बाबतीत मात्र असेल घडताना पाहायला मिळाले नाही. मेरीच्या सामन्यानंतर बऱ्याच जणांनी निकालावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण बऱ्याच जणांना मेरीने हा सामना जिंकला आहे, असे वाटले होते. मेरीच्या प्रशिक्षकांनाही तीच विजयी ठरल्याचे वाटत होते, जेव्हा सामन्याचा निकाल घोषित करण्यात आला तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता आणि त्यांनीही या निकालावर नाराजी व्यक्त केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fhQhma

No comments:

Post a Comment