Breaking

Friday, July 30, 2021

बायो बबलचे नियम मोडले; तिघा क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई, एक वर्षाची बंदी आणि... https://ift.tt/3ffnZso

कोलंबो: करोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा प्रकारात काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाते. अशी कारवाई आतापर्यंत कोणत्याही खेळाडूवर झाली नव्हती. पण क्रिकेट विश्वात अशी मोठी कारवाई झाली आहे. ज्याने तिघा क्रिकेटपटूंना धक्का बसलाय. वाचा- इंग्लंड दौऱ्यावर असताना जैव सुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केल्याबद्दल श्रीलंकेच्या तिघा क्रिकेटपटूंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या पाच सदस्यांच्या समितीच्या अहवालाच्या आधारावर फलंदाज धनुष्का गुणतिलका, कुसाल मेंडिस आणि विकेटकीपर निरोशन डिकवेला यांच्यावर एक वर्षाची बंदी आणि १० मिलियन श्रीलंका रुपये भारतीय चलनात ३८ लाख रुपये इतका दंड करण्यात आला आहे. यासंदर्भात समितीने खेळाडूंवर १८ महिन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्याच बरोबर २५ हजार डॉलर इतका दंड करण्यास सांगितले होते. वाचा- या तिनही खेळाडूंनी जून महिन्या इंग्लंड दौऱ्यावर असताना तिसऱ्या वनडे मालिकेआधी डरहममध्ये करोना सुरक्षेसाठी तयार केलेले बायो बबल वातावरणाचे नियम मोडले होते. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटने त्यांना तातडीने मायदेशात बोलवले. एका न्यायाधिशाचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय समितीने या तिघांना दोषी ठरवले. इंग्लंड दौऱ्यातील या घटनेनंतर या तिघांचा भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विचार करण्यात आला नव्हता. वाचा- करोना संदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष, दुसऱ्या खेळाडूंना धोक्यात घालने, रात्री १०.३० पर्यंत हॉटेल रुममध्ये परत न येणे आणि देश तसेच क्रिकेट बोर्डाचे नाव बदनाम असे आरोप या तिघा क्रिकेटपटूंवर करण्यात आले होते. पाहा तेव्हाचा व्हायरल व्हिडिओ


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ltkx1x

No comments:

Post a Comment