Breaking

Saturday, July 31, 2021

पेट्रोल-डिझेल दर ; जाणून घ्या नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहे इंधन दर https://ift.tt/3lpXYdI

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज रविवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७५ डॉलर नजीक असला तरी तूर्त कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. आज सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव 'जैसे थे'च आहे. मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे. मुंबईत आज रविवारी डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. इंधन दरवाढीवरून विरोधाकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त दरवाढीला ब्रेक दिला आहे. सलग १५ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. मागील आठवडाभर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली. शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव ०.२८ डाॅलरने वधारला आणि तो ७६.३३ डाॅलर प्रती बॅरल झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.३३ डाॅलरने वधारुन ७३.९५ डाॅलर झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xgBA98

No comments:

Post a Comment