पुणे: पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या मेट्रोची पहिली औपचारिक ट्रायल रन आज सकाळी पार पडली. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वत: मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. () वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर मेट्रो धावली. पहिल्यांदा ट्रायल रन होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सकाळची वेळ असूनही मेट्रो मार्गावर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज केवळ तांत्रिक चाचणी असल्यानं कुणीही गाडीतून प्रवास केला नाही. मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण यावेळी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे एमडी ब्रीजेश दीक्षित हे यावेळी उपस्थित होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या पाच किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रीजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WCnVfZ
No comments:
Post a Comment