Breaking

Thursday, July 29, 2021

भारताची दणदणीत सुरुवात; दीपिकाकुमारी इतिहास घडवला, सुवर्णपदकाच्या जवळ https://ift.tt/3fcZAUl

टोकोयो: टोकियो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारची सकाळ भारतासाठी आनंदाची बातमी घेऊन आली. महिला तिरंदाजीत भारताच्या दीपिकाकुमारीने रशियाच्या खेळाडूचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतिशय चुरशीच्या लढतीत दीपिकाने ६-५ असा विजय मिळवला. ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला तिरंदाज ठरली आहे. वाचा- ३० जुलै रोजी सकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या दीपिकासमोर रशियाच्या क्सेनिया पेरोवाचे आव्हान होते. पहिल्या सेटमध्ये दीपिकाने २८-२४ अशी बाजी मारली. पण दुसरा सेट तिने २६-२७ असा गमावला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये २८-२७ने विजय मिळवत २-१ अशी आघाडी घेतली. दीपिकाला विजयासाठी फक्त एक सेट जिंकण्याची गरज होती. पण चौथ्यामध्ये पेरोवाने बरोबरी केली. तर पाचव्या सेट परोवाने २५-२६ असा जिंकला. वाचा- पाच सेटनंतर दोघींचे प्रत्येकी ५ गुण झाल्याने शूट ऑफचा निर्णय झाला. या शूट ऑफमध्ये क्सेनिया पेरोवाने फक्त ७ गुण मिळवले. त्यामुळे दीपिकाला विजयासाठी ८ गुण पुरेसे होते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दीपिकाने परफेक्ट १० मिळवत विजय मिळवला. किमान कास्य पदक मिळवण्यासाठी दीपिकाला फक्त एका विजयाची तर सुवर्णपदक जिंकण्यासाठी दोन विजयांची गरज आहे. दीपिकाची उपांत्यफेरीतील लढत आज (३० जुलै) साडे आकरा वाजता होणार आहे. पदकतालिकेत सध्या चीन १५ सुवर्ण, ७ रौप्य आणि ९ कास्य पदकासह पहिल्या तर जपान १५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका १४ सुवर्ण, १४ रौप्य आणि १० कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४७व्या स्थानावर आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3f8fPCk

No comments:

Post a Comment