जळगाव: निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सोमवारी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनलबाबत एकमत झाले असले तरी जागावाटपाबाबत सर्वपक्षीय सदस्यांची कोअर कमिटीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नेते शेजारी शेजारी बसले पण दोघांत संवाद मात्र झाला नाही. ( Update ) वाचा: अजिंठा विश्रामगृहात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, शिरीष चौधरी, अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, दिलीप वाघ, वाल्मीक पाटील, प्रदीप देशमुख, उदय पाटील, संतोष चौधरी, डी.जी.पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत गिरीश महाजन यांनी जागावाटपासह अध्यक्ष-उपाध्यक्ष पद देखील वाटून घेण्याचे मत मांडले. यावर सव्वा-सव्वा वर्ष हे पद देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच याबाबत ठाम निर्णय कोअर कमिटीच्या पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. वाचा: गिरीश महाजन उशिरा आणि चर्चांना उत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन दुपारी चार वाजता करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमुळे ही बैठक ५ वाजता सुरू झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी या बैठकीला सर्वात आधी उपस्थिती लावली. मात्र भाजपचा एकही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित नसल्याने, बैठक लांबतच गेली. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना तब्बल एक तास प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी ६.३० वाजता गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण या बैठकीसाठी अजिंठा विश्रामगृहावर दाखल झाले. त्यांना उशीर झाल्याने काहीवेळ चर्चांना उत आला. खडसे-महाजन आले एकत्र! पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांच्या ८ सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठीत करण्यात आली आहे. कमिटीत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलसाठी झालेल्या बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकत्र आले. दोघेही शेजारी शेजारीच बसले. मात्र, दोन्ही नेत्यांचा संवाद या बैठकीत झाला नाही. पत्रकार परिषदेत देखील या नेत्यांनी एकमेकांचे नाव घेणे टाळले. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WHPDIq
No comments:
Post a Comment