अहमदनगर : आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेत आलेल्या येथील तहसीलदार यांच्याविरुद्ध आता लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकरणांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याची तक्रार पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. देवरे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून अद्याप मार्ग निघालेला नाही. त्यांच्याविरुद्धच्या चौकशीचे निर्णयही प्रलंबित आहेत. त्यातच आता थेट लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ( ) वाचा: पारनेर तालुक्यातील , संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावतीने पुण्यातील अॅड. असीम सरोदे, अॅड. अजित देशपांडे व अॅड. अक्षय देसाई यांनी ही ऑनलाइन याचिका सोमवारी दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदावर नुकतीच न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच मोठे प्रकरण ठरले आहे. वाचा: या याचिकेत देवरे यांच्यावर तक्रारदारांनी अनेक आरोप केले आहेत. स्वतःच्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतुने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर सोडून देणे अशा अनेक प्रकरणात ज्योती देवरे यांनी तब्बल पाच कोटी, ९४ लाख रुपयांच्यावर घोटाळा केला आहे, असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यासंबंधी अनेक पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीच्या अहवालाचाही आधार घेण्यात आला आहे. नगरच नव्हे तर धुळे येथे कार्यरत असतानाच्या काळातील तक्रारींचाही यामध्ये समावेश आहे. वाचा: यासंबंधी याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. सरोदे म्हणाले, ‘हे अतिशय दुर्दैवी आणि विरोधाभासी चित्र आहे की देवरे या सध्या ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्याच तालुक्यात समाजसुधारक आणि भ्रष्टाचार विरोधातील अग्रगण्य व्यक्तिमत्व यांचे गाव राळेगणसिद्धी देखील आहे. हजारे हे लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी व भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी लढत आहेत. लोकसेवेत असलेल्या व्यक्तीने विविध मार्गांनी भ्रष्टाचार करणे, झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणे, अपारदर्शक व्यवस्थापन असणे व जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नागरिकांसाठीच्या सनदेचे पालन न करणे हा 'कुप्रशासनाचा' भाग आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासन व लोकशाहीवरील सामान्य माणसाचा विश्वास कमी होणे धोकादायक आहे.' वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BsZgtd
No comments:
Post a Comment