Breaking

Tuesday, August 3, 2021

खावाले काळ, नि भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार; शेलारांचे टीकास्त्र https://ift.tt/37j2By4

नंदुरबार: उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे आमदार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्याचे सांगत शेलार यांनी ठाकरे सरकारचे वर्णन ‘खावाले काळ, नि भूईले भार हे ’असे अहिराणी भाषेत केले आहे. (bjp mla ashish ) उत्तर महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले शेलार यांनी नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज नंदुरबार मधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. एक अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशन साठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे, जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजून मंत्रालयातच नाही पोहोचले ते नंदुरबार सारख्या अती दुर्गम भागात कधी व कसे पोहचणार? राज्याच सरकार नाही पण नंदुरबार पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मात्र पोहचलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना सुरु असलेला हा जिल्हा आहे. क्लिक करा आणि वाचा- नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. २० जुलैपर्यंत ३ लाख ५ हजार हेक्टर पैकी १ लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली तर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पिक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. २० हजारांपेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवाल ही त्यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- शेतीच्या, पाण्याच्या अडचणीमधे असताना ठाकरे सरकार नंदुबारमधे नाहीच पण पालकमंत्री मात्र गायब आहेत. आदिवांसींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं "कट कमिशन" घेणे सुरु असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांवर केला आहे. याबाबत भाजप आक्रमक पावले उचलेल असे ही ते म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lrW4JV

No comments:

Post a Comment