वॉशिंग्टनः अमेरिकेच्या संरक्षण विभागाची इमारत पेंटागनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाहीए. पेंटागनजवळील एका सब-वे स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याचा आवाज आला आहे. यात कमीत कमी दोन जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोर अजूनही सक्रिय आहे. या घटनेने परिसरात तणाव असून नागरिकांना दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. मेट्रो बस प्लॅफॉर्मवर ही घटना घडली. पेंटागनमध्ये येणासाठी हे एक मोठे प्रवेशद्वार आहे. इथून हजारो नागरिक ये-जा करत असतात. आद्याप परिसर सुरक्षित नाहीए. यामुळे नागरिकांना दूर रहावं, असं फोर्स प्रोटेक्शन एजन्सीचे प्रवक्ते क्रिस लेमेन यांनी म्हटलं आहे. पण गोळीबार झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलेला नाही आणि त्यात कुणीही जखमी झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. CNN ने हे वृत्त दिलं आहे. अमेरिकेच्या सैन्याच्या मुख्यालयाबाहेर अनेक जण जखमी झाल्याचा दावा न्यूज एजन्सी असोसिएटेड प्रेसने आपल्या वृत्तातून दावा केला आहे. वृत्तसंस्थेच्या पत्रकारने पोलिसांना 'शूटर' बोलताना ऐकलंय. पण अधिकृतरित्या या गोळीबाराच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jmSSMG
No comments:
Post a Comment