प्रवीण मुळ्ये,नीरज पंडित मुंबई : , , पोलादपूर, खेड तालुक्यात आलेल्या महापुरानंतर पूरग्रस्तांपर्यंत तातडीची मदत पोहोचत नसल्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर या चारही तालुक्यातील सुमारे २६ हजारांहून अधिक कुटुंबांच्या खात्यात मदत पोहोचू लागली आहे. याचबरोबर धान्यवाटपाच्या कामालाही गती मिळाली आहे. २२ जुलैला आलेल्या महापुरानंतर चिपळूण तालुक्यात ११ हजार ८०५ कुटुंबे पूरग्रस्त झाली तर खेड तालुक्यात ही संख्या ७५७ इतकी आहे. महाड तालुक्यात १४ हजार ३६८ कुटुंबे तर पोलादपूरमध्ये १ हजार ९७४ कुटुंबे पूरग्रस्त झाली. या कुटुंबांना कपडे, भांडी, जेवणाचे सामान, निवारा आदींची अडचण असल्याचे वास्तव 'मटा'ने विविध वृत्तांमधून समोर आणले. यानंतर प्रशासनाकडून मंगळवारपासून या कुटुंबीयांच्या खात्यात तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली. उर्वरित पाच हजार लवकरच जमा केले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या पुरामध्ये जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात चार लाख रुपये जमा करण्यात आले आहे. काही जणांची रक्कम वारसांकडून संमती न मिळाल्याने अडकलेली आहे. मात्र ती लवकरच खात्यात जमा होईल, असा विश्वास प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. या पुरामध्ये शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून चारही तालुक्यात मिळून एक हजार ११४ हेक्टर जमीन सध्या कसता येणार नाही, अशा परिस्थिती असल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. ही जमीन दरडीखाली गेली आहे किंवा काही जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चिखल जमा झाले आहे. अशा प्रकारची सर्वाधिक ६१० हेक्टर जमीन ही चिपळूण तालुक्यात आहे. याशिवाय पिकांचे नुकसान झालेल्याची वेगळी नोंद करण्यात आली आहे. अशा सर्व प्रकारात मिळून सुमारे पाच हजार शेतकरी बाधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मदतीचे नियोजन चिपळूण तालुक्यातील लोकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्यात आलेत. सध्या सर्व पंचनामे पूर्ण झाले असून पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे चिपळूणचे प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले. तर सरकारकडून प्राप्त झालेले गहू, तांदूळ प्रत्येकी १० किलो या स्वरूपात ६६७ क्विंटल धान्याचे वाटप स्थानिक शिधावाटप दुकानांमार्फत करण्यात आले आहे. याचबरोबर मंगळवारी सरकारकडून साठा उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला पाच किलो तूरडाळ आणि पाच लिटर केरोसीनचे वाटपही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. बाहेर गावांतून येणाऱ्या मदतीचेही योग्य नियोजन करण्यासाठी कापसाळ येथील पाटीदार भवन येथे शासकीय संकलन केंद्र सुरू करण्यात आले होते. तेथूनही ग्रामीण भागांपर्यंत मदत पोहोचवण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. तर खेड तालुक्यात आतापर्यंत सुमारे ९१ लाखांचे वाटप करण्यात आले असून रघुवीर घाट वगळता अन्य भागात तुटलेले पूल जोडून वाहतूक सुरू करण्यात आल्याचे तालुक्याचे प्रांत अविशकुमार सोनोने यांनी सांगितले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार झालेले नुकसान नुकसानीचा प्रकार चिपळूण खेड महाड पोलादपूर शेतीजमीनीचे नुकसान (हेक्टरमध्ये) ६१० ४४ १७८ २८२ पूर्णतः नुकसान झालेली घरे ४० ५५ ९१ १० अंशतः नुकसान झालेली घरे ११९८ १२३८ ९६९५ ५७० पडझड झालेले गोठा-वाडा २९१ ५२ ६७ ४६ झोपड्या १ ६५ - -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TU9J0O
No comments:
Post a Comment