Breaking

Wednesday, August 4, 2021

Today Olympic Schedule: एक सुवर्णासह चार पदक जिंकण्याची संधी; पाहा कोण जिंकून देऊ शकते पदक https://ift.tt/3AfaHnJ

टोकियो: ऑलिम्पिक २०२० मध्ये चार ऑगस्ट भारतासाठी आनंदाचा आणि दिलासा देणारा ठरला. आता आज पाच ऑगस्ट रोजी भारताल पुन्हा एकदा पदक मिळवून देणारा दिवस ठरू शकतो. भारताने आतापर्यंत १ रौप्य आणि २ कास्य पदक पटकावली आहेत. या पदक संख्येत चारने वाढ करण्याची संधी भारताला आहे. वाचा- कुस्तीमध्ये दहिया याला सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. त्याच बरोबर दीपक पुनियाला कास्यपदक जिंकण्याची संधी आहे. तर महिलांमध्ये अंशू मलिकला पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळू शकते. विनेश फोगट देखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज लढणार आहे. हॉकीमध्ये भारताचा पुरुषांचा संघ आता जर्मनीविरुद्ध कास्य पदकाची मॅच लढत आहे. हॉकी संघाला ४१ वर्षानंतर पदक जिंकण्याची संधी आहे. असा आहे भारताचा टोकियो ऑलिम्पिकमधील पाच ऑगस्ट रोजीचा कार्यक्रम अॅथलेटिक्स: २० किमी चालण्याची शर्यत- केटी इरफान, राहुल रोहिला, संदीपकुमार; दुपारी १ पासून हॉकी: पुरुष कास्य पदक लढत, भारत विरुद्ध जर्मनी कुस्ती: विनेश फोगट विरुद्ध स्वीडनची सोफीया यांची लढत कुस्ती: अंशू मलिक विरुद्ध व्हॅलेरिया कुस्ती:रवी दहिया विरुद्ध रशियाचा झावूर, दुपारी २.४५ वाजता कुस्ती:दीपक पुनियाची कास्य पदक लढत दुपारी २.४५ नंतर काल चार ऑगस्ट रोजी रवीकुमार दहियाने कझाकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. तो आता सुवर्णपदकासाठी लढेल. तर ८६ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टेलर कडून पराभूत झाला. पण दीपक आज कास्य पदक जिंकू शकतो. महिला हॉकी संघाला काल उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने १-२ असे पराभूत केल्याने आता ते ग्रेट ब्रिटन विरुद्ध कास्य पदकासाठी लढतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TZcYEm

No comments:

Post a Comment