Breaking

Wednesday, August 4, 2021

धक्कादायक... भारताच्या रवी दाहियाला प्रतिस्पर्धी खेळाडूने घेतला कडकडून चावा, फोटो पाहाल तर हैराण व्हाल... https://ift.tt/3Cku80C

टोकियो : भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्याचे आता एक पदक निश्चित झाले आहे. रवी दहियाने ५७ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पण या सामन्यात रवीला कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवने कडकडून चावा घेतल्याचे पाहायला मिळाले. ही धक्कादायक घटना घडत होती तेव्हा कोणालाही कळले नाही. पण रवी दहिया मात्र ही गोष्ट सहन करत राहीला आणि त्याने सामना सोडला नाही. या सामन्यात शौर्य दाखवत रवी दहियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवविरुद्ध रवी कुमारने २-१ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर नूरीस्लामने रवी कुमारविरुद्ध ९-२ अशी मोठी आघाडी घेऊन धक्का दिला. पण रवीने जोरदार कमबॅक केले आणि विजय मिळवला. रवी कुमारने बुल्गारियाच्या जॉर्जी वालेंटिनो वांगेलोव याचा टेक्निकल सुपिरियोरिटीने पराभव करून उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती. 23 वर्षीय रवीने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (2019), 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (2018) आणि आशियाई कुस्ती स्पर्धा (2020 आणि 2021)मध्ये पदके जिंकली आहेत. अंशु मलिकला कांस्यपदकाची संधी...भारताची कुस्तीपटू अंशु मलिक आज पराभूत झाली होती, पण अंशुला ज्या एरिनाने पराभूत केले आहे ती आता अंतिम सामन्यात पोहोचली आहे, त्यामुळे ती आता सुवर्णपदक पटकावू शकते. कुस्तीमधील नियमानुसार जो खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतो आणि त्याने ज्या खेळाडूंना पराभूत केले असते त्यांना कांस्यपदक पटकावण्याची संधी असते. कुस्तीमध्ये या गोष्टीला रेपिकेच असे म्हटले जाते. त्यानुसार आता एरिना अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यामुळे एरिनाकडून पराभूत झालेल्या भारताच्या अंशु मलिकला आता कांस्यपदक पटकावण्याची नामी संधी असेल. हे सामना उद्या होणार आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये विनेशने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने तब्बल आठ पदके पटकावली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रकुल आणि आशियाई गेम्समध्ये तिने प्रत्येकी २-२ पदके आपल्या नावावर केली आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विनेशने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे उद्या विनेश कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्या सकाळी आठ वाजता विनेशचा पहिला सामना होणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xmIWYz

No comments:

Post a Comment