Breaking

Wednesday, August 4, 2021

पेगाससवरून विरोधक आक्रमक; राज्यसभेत TMC चे ६ खासदार निलंबित https://ift.tt/3fz6NhE

नवी दिल्लीः विरोधी पक्षांच्या एकजुटीने संसदेत पेगासस हेरगिरी प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मंजूर करण्याच्या विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ केला आणि घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेत विरोधी पक्षांच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आलं. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात फलक दाखवणाऱ्या आणि गदारोळ करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना ( ) दिवसभरासाठी निलंबित केलं संसदेत विरोधकांचा गेल्या अनेक दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. या गदारोळाला सरकारचा अहंकार कारणीभूत असल्याचं विरोधी पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. तसंच संसदेत पेगासस आणि कृषी कायद्यांवर चर्चेची मागणी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विरोधी पक्षातील १८ नेत्यांकडून हे निवेदन जारी केले गेले. राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेतील द्रमुकचे टीआर बालू, काँग्रेसचे आनंद शर्मा यांच्यासह तृणमूल काँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांचा समावेश आहे. दोन्ही सभागृहांमध्ये आतापर्यंत ८ विधेयकं मंजूर पेगासस प्रकरणी विरोधकांचा गदारोळ सुरूच असल्याचं पाहून सरकारने या गदारोळातच गेल्या काही दिवसांत ८ विधेयक मंजूर केली आहेत. यामुळे विरोधी पक्ष आणखी अस्वस्थ झाले आहेत. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. पेगासस प्रकरणावरून राज्यसभेत बुधवारी विरोधी पक्षाचे खासदार सभागृहाच्या मध्यभागी येऊन घोषणा करत होते. सभापतीच्या आसनासमोर ते फलक आणि पोस्टर घेऊन घोषणाबाजी करू लागले. सभापती व्यंकय्या नायडू यांना त्यांना जागेवर बसण्याचं आवाहन केलं. पण विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर नायडू त्यांना इशारा दिला. तरीही न ऐकल्यावर नियम २५५ नुसार तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित केलं. यात डोला सेन, अर्पिता घोष, नदीम उल हक, अबीर रंजन विश्वास, शांती छेत्री आणि मौसम नूर यांचा समावेश आहे. त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं गेलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fwrrz5

No comments:

Post a Comment