Breaking

Wednesday, August 4, 2021

पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला ऑलआऊट करून भारताने किती धावा केल्या, पाहा... https://ift.tt/3jqX1iM

ट्रेंट ब्रिज : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आज भारतानेच गाजवल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आज भन्नाट कामगिरी करत इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय संघही फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संयतपणे फलंदाजी केली. त्यामुळे भारताने पहिल्या दिवसअखेर एकही विकेट न गमावता २१ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही १६२ धावांनी पिछाडीवर आहे. पहिल्याच षटकात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडची १ बाद ० धावा अशी अवस्था झाली होती. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण मोहम्मद शमी आणि बुमरा यांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने यावेळी अर्धशतक झळकावत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. रुटने यावेळी ११ चौकारांच्या जोरावर ६४ धावांची खेळी साकारली. पण रुटचा अपवाद वगळला तर एकाही इंग्लंडच्या खेळाडूला यावेळी अर्धशतकी खेळी साकारता आली नाही. बुमराने यावेळी सलामीवीर रॉरी बर्न्स, जोस बटलर, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड याच चार खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. शमीने यावेळी जॉनी बेअरस्टो, डॅन लॉरेन्स आणि सलामीवीर डॉम सिब्ले यांना बाद केले. शार्दुल ठाकूरने यावेळी इंग्लंडचा अर्धशतकवीर कर्णधार जो रुट आणि ऑली रॉबिन्सन यांना बाद केले. मोहम्मद सिराजने या डावात एक विकेट मिळवली. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ आला आणि रोहित शर्माने चौकार लागवत भारताला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या दिवसअखेर भारताची एकही विकेट पडलेली नसून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघेही प्रत्येकी ९ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ अजूनही १६२ धावांनी पिछाडीवर असून ते आता दुसऱ्या दिवशी किती धावसंख्या उभारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lxz10i

No comments:

Post a Comment