Breaking

Tuesday, August 31, 2021

फेरीवाल्यांची मग्रुरी कायम; मुंबईत रस्ते, फुटपाथवर पुन्हा अतिक्रमण https://ift.tt/3DBZEYw

म. टा. विशेष प्रतिनिधी कारवाई करण्यास गेलेल्या ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या ऐरणीवर आली असून सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांची मग्रुरी मोडून काढण्याची मागणी मुंबईकरांकडून केली जाते आहे. करोनासंकटाचा फायदा घेत फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते, फूटपाथ आणि मोकळ्या जागांवर अतिक्रमण सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत फेरीवाल्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत असून त्या तुलनेत पालिकेची कारवाई थंडावली असल्याचे चित्र आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीचे सर्रास उल्लंघन होते आहे. दादर, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, कुर्ला, घाटकोपर या परिसरातील फूटपाथ आणि रस्ते फेरीवाल्यांनी पुन्हा व्यापले आहेत. मुंबईत रेल्वे स्थानक व पालिकेच्या मंडयांलगत फेरीवाल्यांचा सर्वाधिक वावर असतो. मुंबई शहर व उपनगरात तीन लाखांपेक्षा जास्त फेरीवाले असल्याचा अंदाज असून यातील ७० टक्के फेरीवाले स्थानकांच्या परिसरात आहेत. त्यामुळे याठिकाणी जाणारे रस्ते, फूटपाथ फेरीवाल्यांनी व्यापून जात आहेत. लॉकडाउन काळात सर्वच व्यवसाय, उद्योग बंद पडल्याने फेरीवाल्यांचा जाच कमी झाला होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण सुरू झाले आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर मुंबईतील सर्वाधिक फेरीवाले बसतात. स्थानक ते आसपासचे रस्ते आणि गल्ल्या फेरीवाल्यांनी बळकावल्या आहेत. पालिकेने कारवाई केल्यानंतर अधिकाऱ्यांची पाठ वळताच फेरीवाले पुन्हा बसत असल्याने पालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. करोनाच्या संकटामुळे पालिकेचा सर्व कर्मचारी वर्ग आरोग्यविषयक उपाययोजनांच्या कामाला लागला आहे. त्याचा फायदा घेत दादरसह सर्वच परिसरात फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले आहे. व्यापाऱ्यांकडून तक्रार मुंबईतील बहुसंख्य फेरीवाले हे अधिकृत दुकानांसमोर बसून व्यवसाय करतात. त्यामुळे लाखो रुपये भाडे भरून अधिकृत व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना ताप झाला आहे. दुकानात विकला जाणारा माल स्वस्त दरात फूटपाथवर विकला जातो. फेरीवाल्यांना जागेचे भाडे, वीज, पाणी, कर्मचारी वेतन द्यावे लागत नाही. पालिकेच्या कारवाईत सातत्य नसल्याने फेरीवाल्यांची मग्रुरी वाढली आहे. लॉकडाउनमुळे सर्व दुकाने बंद असतानाही फेरीवाले बिनधास्त धंदा करत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार फेडरेशन ऑफ रिटेल व्यापारी संघटनेने मागील महिन्यात पालिका आयुक्तांकडे केली आहे. फेरीवाल्यांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना नवीन नाहीत. कारवाईसाठी संबंधित विभागातील अधिकारी पोलिस संरक्षण मागून घेतात. पोलिसांकडून कारवाईला सहकार्य मिळते. करोनाकाळातही अवैध फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई सुरूच आहे. शरद बांडे, अधीक्षक परवाना विभाग मुंबई महापालिका ठाण्यातील घटना दुर्दैवी आहे. मात्र कुठल्याही महापालिकेत हप्ता घेऊनच फेरीवाल्यांना व्यवसाय करू दिला जातो. करोनाकाळात फेरीवाल्यांचे हाल होत असून कारवाया थांबलेल्या नाहीत. अधिकारी स्वतःच तक्रारी लिहून फेरीवाल्यांना हजारोंचा दंड ठोठावतात. दयाशंकर सिंह, आझाद हॉकर्स युनियन पालिकेच्या २०१४ च्या सर्वेक्षणानुसार .... मुंबईत पात्र फेरीवाले ९९ हजार ४३५ परवानाधारक फेरीवाले १५ हजार ३८१ फेरीवाला व्यवसायासाठी प्रस्तावित रस्ते १,३६६ बसण्यासाठी प्रस्तावित जागा ३० हजार शहर फेरीवाला समितीत नगरसेवकांचा समावेश नसल्याने फेरीवाला धोरणाची अमलबजावणी प्रलंबित दादागिरी मोडून काढावी ठाण्यात घडलेली घटना म्हणजे फेरीवाल्यांच्या दहशतीचा कळस आहे. या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. सामान्य नागरिकांना दुकानातील महागड्या वस्तू परवडत नसल्याने फेरीवाले हा त्यांच्यासाठी स्वस्तातील पर्याय आहे. मात्र याचा अर्थ फेरीवाल्यांनी कायदा धाब्यावर बसवून व्यवसाय करावा असे नाही. कोणतेही कायदे, कानून, नियम आपल्यासाठी नाहीत, अशी फेरीवाल्यांची भूमिका असते. ती त्यांच्या संघटनांनी आधी मोडून काढायला हवी. पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतेचे नियम किती फेरीवाले पाळतात, हे रोज उघड दिसते आहे. रस्ते आणि फूटपाथ सामान्य नागरिकांना चालण्यासाठी आहेत. फेरीवाल्यांसाठी नाहीत. नियमाप्रमाणे व्यवसाय आणि फेरीवाल्यांची दादागिरी मोडून काढणे हाच यावरचा उपाय आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DDMg6i

No comments:

Post a Comment