Breaking

Wednesday, August 25, 2021

'पीओपी'च्या मूर्तींचे कुठेही विसर्जन करता येणार नाहीः कोर्टाचे आदेश https://ift.tt/3Dj8MAV

म. टा. प्रतिनिधी, नागपूरः गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची विक्री मूर्ती म्हणून करता येणार नाही, तर एक वस्तू करता येईल. मात्र, ग्राहकांनी अशा मूर्तींची पूजा करू नये, तसेच 'पीओपी'च्या मूर्तींचे कुठेही विसर्जन करता येणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. पर्यावरणाला हानीकारक असल्याच्या कारणावरून केंद्र, तसेच राज्य सरकारने 'पीओपी'च्या मूर्तींवर बंदी घातली आहे. याच अंतर्गत नागपूर महापालिकेनेदेखील 'पीओपी'च्या मूर्तींची विक्री, तसेच साठवणूक करण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाविरुद्ध विनोदकुमार गुप्ता आणि श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशनने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मूर्तिकारांकडील 'पीओपी'च्या मूर्तींच्या साठ्याची विक्री करू द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. 'पीओपी मूर्तींवर बंदी अचानक लावण्यात आलेली नाही. हा निर्णय २०१२पासून लागू आहे. त्यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे म्हणता येणार आहे. याउपरही मूर्तिकारांचे आर्थिक हित जपण्यासाठी म्हणून घालून दिलेल्या अटींवर विक्री करण्याची मुभा देता येईल,' असे न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने नमूद केले. मूर्तींच्या सरसकट विक्रीची मागणी मात्र खंडपीठाने फेटाळली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zl0zdl

No comments:

Post a Comment