Breaking

Wednesday, August 25, 2021

कच्च्या तेलातील तेजी कायम ; पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला हा निर्णय https://ift.tt/3gB4Y4y

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या सत्रात तेलाचा भाव वधारला आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थेच ठेवला आहे. मुंबईत आज गुरुवारी एक लीटर १०७.५२ रुपये आहे.आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.२० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.९१ रुप्यानापर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९८ रुपये झाले आहे. आज देशभरात डिझेलचा भाव स्थिर आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.९२ रुपये आहे. चेन्नईत ९३.५२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.९८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.७२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.३४ रुपये आहे. करोना डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात कच्या तेलाच्या भावात तेजी दिसून आली आहे. सलग तीन दिवस तेलाचा भाव वाढला असून त्यात ७ डॉलरची वाढ झाली आहे. बुधवारी बाजार बंद होताना ब्रेंट क्रूडचा भाव १.२० डॉलरने वधारला आणि तो ७२.२५ डॉलर प्रती बॅरल झाला. त्याचबरोबर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८२ डॉलरने वधारून ६८.३६ डॉलर झाला. अमेरिकेत कच्च्या तेलाचा साठा कमी झाल्याने तेलाचे भाव तेजीत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी स्थिर ठेवले होते.तर मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैशांची कपात केली होती. त्याआधी सोमवारी पेट्रोल आणि स्थिर ठेवले होते. रविवारी ३५ दिवसांनंतर पेट्रोल २० पैशांनी स्वस्त झाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sLGvOR

No comments:

Post a Comment