Breaking

Tuesday, August 3, 2021

तलावात बुडणाऱ्या पुतण्याला वाचवताना काका- पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू https://ift.tt/3ioaRDy

जालनाः पाण्यात बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी काकाने तलावात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. शहरालगत असलेल्या घाणेवाडी तलावात काल मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. परमेश्वर भानुदास खंडागळे(५०) व रोहित कृष्णा खंडागळे (१८, दोघे रा. मांडवा), अशी मृतांची नावेआहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जालना जवळील घाणेवाडी तलावाच्या मांडव्याकडील बाजूने रोहित खंडागळे हा नेहमीप्रमाणे गुरे चारत होता. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असूनवरील बाजूने गाळ उपसा झाल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. गुरे चारत असताना तलावाच्या काठावर असलेल्या रोहितचा पाय घसरून तो पाण्यात पडला. रोहित पाण्यात बुडत असताना सोबतच्या मुलांनी आरडाओरडा करत आजूबाजूला मदत मागितली. मुलांचा आवाज ऐकून जवळच शेतात काम करत असलेले रोहितचे काका परमेश्वर खंडाळे हे धावत घटनास्थळी आले. त्यानी रोहितला वाचवण्यासाठी तलावात उडी टाकली. पाण्यात असताना घाबरलेल्या रोहितने परेश्वर यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. रोहितनं घट्ट पकडून ठेवल्यामुळं परमेश्वर यांना कोणतीही हालचाल करता आली नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37fLRId

No comments:

Post a Comment