Breaking

Tuesday, August 3, 2021

अप्सरा मालदिवमध्ये ! सोनालीचा बोल्ड बिकिनी लुक सोशल मीडियावर व्हायरल https://ift.tt/3ltdvtE

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. मालदिव व्हेकेशनचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघं 'मिनीमून'साठी पूर्व आफ्रिकेत गेले होते. आता ही दोघं मालदिव इथं गेले आहेत. सोनालीनं तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिकिनीत बोल्ड अंदाज सोनालीनं बिकिनीतला एक फोटो शेअर केला असून त्यात तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेन्ट्चा वर्षाव केला आहे. लग्न झाल्यानंतर सोनाली कुणालसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. पण तिनं नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सोनालीनं त्यांच्या मालदिव व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.करोना व्हायरसमुळे प्रत्येक देशानं काहीना काहीतरी निर्बंध लावले आहेत. असं असताना सोनाली आणि कुणाल फिरण्याची हौस पूर्ण करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TPQeXa

No comments:

Post a Comment