Breaking

Saturday, August 28, 2021

महिला प्रसूत झाल्यावर बलात्कार झाल्याचे उघड; तिघांना अटक https://ift.tt/3mEq6L1

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात शिवनाकवाडी येथील अविवाहित महिलेवर सामुहिक केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सचिन आण्णाप्पा खोत उर्फ डबकारे (वय ३५, रा. बरगावे गल्ली, जैन मंदिरजवळ, शिवनाकवाडी, ता. शिरोळ), सुधीर राजाराम उर्फ तम्मा खोत उर्फ सातारे (वय २९, रा. हनुमान मंदिरजवळ शिवनाकवाडी), सदानंद उर्फ नंदू चंद्रकांत खोत (वय २४, रा. रेणुका मंदिराजवळ, शिवनायकवाडी) यांना अटक केली असून संदीप खोत हाही या गुन्ह्यात संशयित आहे. ( of unmarried woman in ) कुरुंदवाड पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. गतवर्षी एक ऑगस्ट २०२० रोजी पिडित महिला इंदिरा महिला सुतगिरणीकडे सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी चारही संशयितांनी तिचा पाठलाग केला. तिला खोत यांच्या उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला वेळोवेळी धमकी देऊन बलात्कार केल्याची फिर्याद पिडित महिलेने दिली. पिडित महिलेला गर्भ राहिल्यानंतर दोन दिवसापूर्वी ती प्रसुत झाली असून तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर संबधित पिडितेवर बलात्कार झाल्याची माहिती पुढे आली. क्लिक करा आणि वाचा- कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी यांनी माहिती दिली. ते म्हणाले पिडितीने मिरज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा कुरुंदवाड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून चौघां संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली असून कुरुंदवाड पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gBP61F

No comments:

Post a Comment