Breaking

Saturday, August 28, 2021

भारताच्या पराभवाचा पाकिस्तानला झाला मोठा फायदा, जाणून घ्या घडलं तरी काय... https://ift.tt/3mGtC7v

हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. पण या भारताच्या पराभवाचा फायदा आता पाकिस्तानला झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या एका पराभवाने समीकरण आता पूर्णपणे बदलले आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला एका डावाने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताच्या संघाला अजून एक धक्का बसला आहे. कारण या सामन्यापूर्वी भारतीय संघ हा विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. भारताने यावेळी पाकिस्तानला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता. पण या पराभवानंतर भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर पाकिस्तानने अव्वल स्थान पटकावले आहे. पराभवानंतरही भारताचे पाकिस्तानपेक्षा जास्त गुण आहे. भारताच्या खात्यात सध्या १४ तर पाकिस्तानच्या खात्यात १२ गुण आहेत. पण विजयाची टक्केवारी ही पाकिस्तानी भारतापेक्षा सरस आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी ही ५० एवढी आहे, तर भारताची ३८.३८ एवढी आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. या क्रमवारीत पाकस्तान अव्वल, तर वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा तिसरा आणि इंग्लंडचा चौथा क्रमांक आहे. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकला असला तरी त्यांना चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच जो संघ बाजी मारेल त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आता या क्रमवारीसाठी चौथा सामना हा सर्वात महत्वाचा असेल. भारत आणि इंग्लंड यांची पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी उर्वरीत सामने हे निर्णायक ठरणार आहेत. कारण या दोन सामन्यांवर मालिकेचा निकाल ठरणार आहे. त्यामुळे या पराभवनंतर भारतीय संघाल कोणता धडा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर चौथ्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कोणते महत्वाचे बदल होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2UVUzZz

No comments:

Post a Comment