Breaking

Sunday, August 29, 2021

तिसऱ्या लाटेचे संकेत? चेंबूर बालगृहात १८ मुलांना करोनाची लागण https://ift.tt/3zzClME

म. टा. विशेष प्रतिनिधी, येथील अनाथाश्रमातील काही मुलांना करोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी चेंबूरमधील बालगृहातील १८ मुलांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलांना वाशी येथे केंद्रात दाखल केले आहे. चेंबूर बालगृहातील एका मुलाची तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने शनिवारी तत्काळ तेथील १०२ मुलांसाठी तपासणी शिबीर घेतले. त्यात ९ ते १८ वयोगटातील १८ मुलांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच त्यांना वाशीनाका येथील करोना केंद्रात ठेवण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी सांगितले. मात्र या मुलांमध्ये करोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. संपूर्ण मुंबईत गेल्या तीन दिवसांत २९ मुलांना करोनाबाधा झाली आहे. त्यात चेंबूर बालगृहातील १८ मुलांसोबतच आग्रीपाड्यातील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील १५ मुलांचाही समावेश आहे. याच अनाथाश्रमातील सात कर्मचाऱ्यांमध्येही करोनाची लक्षणे आढळली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2UVRgBs

No comments:

Post a Comment