म. टा. विशेष प्रतिनिधी, महापालिकेतील एका कामाची निविदा काढताना १२९ कोटी रुपयांचे काम दाखविले, मात्र नंतर हेच काम ५०० कोटींवर नेऊन ठेवण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असून असे काम करणारा महापालिकेतील हा कोण असा प्रश्न भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना एका पत्राद्वारे विचारला आहे. पालिकेतील कामाची निविदा काढताना १२९ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. मात्र नंतर वाढीव काम दाखवत हाच खर्च ५०० कोटींवर नेण्यात आला. खर्च वाढल्यास इतर कामांच्या निविदा न काढता रकमेतील निधीमध्ये फेरफार केला आहे का? हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या पैशांचा चुराडा होत असताना केवळ बघत बसणार नाहीत, संबंधित प्रकरणाची चौकशी करा आणि पालिकेतील या 'सचिन वाझे'च्यावर कारवाई करा, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gLSkzB
No comments:
Post a Comment