Breaking

Friday, October 1, 2021

कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही; अजित पवार म्हणाले... https://ift.tt/2ZTpVCl

: संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसून सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोविड मार्गदर्शक सूचना आणि त्या अनुरूप वर्तणुकीची माहिती देण्यात यावी. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शाळांना सूचना द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले. ( ) वाचा: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'विद्यार्थ्यांना मास्क घालणे, शारिरीक अंतराचे पालन करणे आणि कोविड संसर्गापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत सातत्याने माहिती देण्यात यावी. वर्गातील बैठक व्यवस्थेतही शारिरीक अंतराचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. येत्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांकडून देखील मास्कचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.' वाचा: पुणे जिल्ह्यात कमी होणारी कोविड बाधितांची संख्या लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागात इतर आजारांच्या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. ग्रामीण भागात एक रुग्णालय स्वतंत्र कोविड बाधितांसाठी आणि दुसरे रुग्णालय इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगात आणावे. एकच रुग्णालय असलेल्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. परिचारिकांची नियुक्ती करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही पवार यांनी दिले. वाचा: सीएसआरच्या माध्यमातून मिळालेल्या लसमात्रांसाठी सिरींजची कमतरता भासत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने १ लाख सिरींजची खरेदी केली. पुणे महापालिकेने देखील अशाचप्रकारे आवश्यकतेनुसार सिरींज उपलब्ध करून घ्यावे. ग्रामीण भागातील लसीकरणासाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. लसीकरणाचा वेग कायम राहील आणि पहिल्या लसमात्रेप्रमाणे नागरिक दुसरी लसमात्रा घेतील यासाठी विशेष प्रयत्न करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या असल्या तरी मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस खासदार गिरीष बापट, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3B3hxhd

No comments:

Post a Comment