Breaking

Friday, October 1, 2021

KKR vs PBKS: पंजाबचा कोलकातावर कडकडीत विजय, मुंबई इंडियन्सला मागे टाकले https://ift.tt/3F7VDvF

दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात शुक्रवारी झालेल्या लढतीत पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ५ विकेटनी पराभव केला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करत केकेआरने पंजाबला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते. वाचा- विजयासाठी १६६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जला कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शानदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. मयांक २७ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्यानंतर निकोलस पूरन ७ चेंडूत १२ धावांवर माघारी परतला. दरम्यान कर्णधार केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले. पुरनच्या जागी आलेला एडन मार्करम १८ धावांवर बाद झाला तर दिपक हुड्डा फक्त ३ धावा करू शकला. वाचा- य... त्याआधी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर वेंकटेश अय्यरच्या ६७ धावांच्या जोरावर कोलकाताने २० षटाकत ७ बाद १६५ धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने ३४ तर नितिश राणाने ३१ धावांचे योगदान दिले. केकेआरचा कर्णधार इयान मॉर्गन धावा करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंजाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ तर रवी बिश्नोईने २ विकेट घेतल्या. वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mgXGEX

No comments:

Post a Comment