Breaking

Thursday, October 28, 2021

२६ दिवसांनंतर शाहरुख खानच्या चेह-यावर दिसलं हसू; आर्यनला जामीन मिळाल्यावर वकिलाची टीम पोहोचली मन्नतवर https://ift.tt/3Gx1wD7

मुंबई : दिवाळीला जरी चार नोव्हेंबरपासून सुरू होणार असली तरी 'मन्नत'वर दिवाळी साजरी करायला आजपासूनच सुरुवात झाली आहे. कारण ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल २६ दिवस तुरुंगात काढल्यानंतर आता खान कुटुंबाचा लाडला 'मन्नत'वर परतणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. त्यानंतर अखेर गुरुवारी आर्यनसह अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन देण्यात आला. आर्यनला ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यनला अटक झाल्यापासून शाहरुख, गौरी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य प्रचंड तणावात होते. शाहरुखच्या चेह-यावरील हसू गायब झाले होते. परंतु जेव्हा मिळाला तेव्हा त्याच्या चेह-यावरील हे हसू परत आले आहे. आर्यनला जामीन मिळाल्यामुळे तो घरी परत येणार असल्याने शाहरुखला होणारा आनंद त्याच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता. केवळ शाहरुखच नाही तर चिमुरड्या अबराम देखील खूप आनंदीत आणि उत्साहित होता. गुरुवारी संध्याकाळी तो मन्नतच्या गच्चीवर बाहेर उभ्या असलेल्या गर्दीकडे पाहून हात हलवताना दिसला होता. आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुख खान मीडियापासून दूर गेला होता. आर्यन जेव्हा तुरुंगात होता तेव्हा शाहरुख सातत्याने अधिका-यांशी सतत संपर्कात होता. या २६ दिवसांमध्ये तो फक्त एकदाच ऑर्थर रोड कारागृहात भेटायला गेला होता. तेव्हा देखील त्याने आर्यनशी इंटरकॉमद्वारे १५ ते २० मिनीटे बोलला होता. त्या दिवसानंतर आतापर्यंत शाहरुख खान सातत्याने त्याच्या लीगल टीमसोबत चर्चा, बैठका घेत होता. आर्यनला गुरुवारी जामीन मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदा त्याचे चेह-यावर हसू असलेले फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख, आर्यनचे वकील सतीश मानशिंदे आणि त्यांची लीग टीमसोबत दिसत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Epk0DH

No comments:

Post a Comment